नवी मुंबई खाडीत फेमींगोचं आगमन

नवी मुंबईला फ्लेमिंगोचे शहर संबोधले जाते, शहरात अनेक ठिकाणी पाणथळे आहेत ज्या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी मध्ये परदेशी पाहुणे अर्थात रोहित पक्षांचे आगमन होते. लाखो किलोमिटरचा प्रवास करत लाखोंच्या संख्येने हे रोहित पक्षी एका विशिष्ट कालावधीसाठी नवी मुंबईत वास्तव्यास येतात, आताही ते आले आहेत.त्यांना पाहण्यासाठी मुंबई सह ठाणे रायगड परिसरातून अनेक पर्यटक गर्दी करत आहेत,त्यांची एक झलक आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी ते अतुर असल्याचे दिसत आहे. त्यांची चालण्याची, खाद्य पकडण्याची विशिष्ठ पद्धत आपल्याला पाहता यावी म्हणून पर्यटक झुंबड करताना दिसतात, लाखोंच्या संख्येने कळपात असणारे रोहित पक्षी यावर्षी कमी प्रमाणात आले असेल तरी त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading