शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याच्या सूचनेवर नारायण राणे यांची टीका

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणार नाहीत कारण त्यांचा राजीनामा घेतला तर आधीच्या म्हणजेच सुशांत सिंग प्रकरणावर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल अशी टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. राज्य सरकार यवतमाळ मध्ये संजय राठोड आणि मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या समर्थनासाठी मिरवणूक आणि मोर्चा काढायला परवानगी मिळते, काय लायसन्स दिले आहे का यांना अत्याचार करायला?  शिवजयंती साधेपणाने साजरी करा म्हणतात तसेच शिवसेनेच्या सत्तेत साधू संताच्या मिरवणूक निघत नसून गुंडांच्या मिरवणुका निघतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसून एकही आश्वासन ठाकरे सरकारने पूर्ण केले नाही. त्याचबरोबर या सरकार मधील अनेक नेत्यांवर महिला अत्याचाराचे आरोप झाले आहेत. आत्महत्या नसून ही हत्या असल्याची शक्यता राणे यांनी व्यक्त केली. तसेच हे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालत असून एकप्रकारे पाठबळ देत असल्याचे राणे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading