शिपायानेच लुटले उद्योजक रवींद्र पालेकरांचे गोडाऊन

ठाण्यातील प्रसिद्ध उद्योजक रवींद्र पालेकर यांचे वसंत विहार, सिद्धांचल येथे असलेल्या गोडाऊन मधील सजावटीचे आणि इंटेरियरचे महागडे सामान कधीकाळी त्यांच्याकडे काम करणाऱ्या शिपायाने चोरून नेले. सचिन शिगवण असे त्याचे नाव असून तो सिद्धेश्वर तलाव परिसरात राहतो. याबाबत अंदाजे पाच लाखांच्या सामानाचा अपहार केल्याप्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. सुप्रसिद्ध व्यवसायिक रवींद्र पालेकर यांचे सिद्धांचल येथील आनंदराम संकुलाचे दुसऱ्या मजल्यावरील स्वतःच्या मालकीचे टेरेस आहे. या टेरेसवर त्यांचे अँटिक असे सजावटीचे साहित्य, शूटिंग साठी लागणारे विविध साहित्य, चांदीचे सिंहासन, गणपतीची मूर्ती आदी अनेक वस्तू ठेवलेल्या होत्या. त्यांच्याकडे सचिन शिगवण हा 2003 पासून शिपाई म्हणून काम करीत होता. परंतु चार वर्षांपूर्वी त्याने नोकरी सोडली होती. पालेकर यांना हृदयरोगाचा आणि मानेच्या मणक्यांचा आजार असल्याने ते याठिकाणी अनेक दिवस आले नव्हते. याचा फायदा उचलत शिगवण हा 20 एप्रिल ते 24 एप्रिल हे चार दिवस टेम्पो आणून याठिकाणी ठेवलेल्या सगळ्या वस्तू घेऊन जात होता. शेवटी त्याने येथील स्लायडिंग खिडक्या आणि आणि रेलिंगही काढल्याने पहिल्या मजल्यावर असलेल्या काही दुकानदारांना संशय आल्याने त्यांनी रवींद्र पालेकर यांना फोन करून तुमचा शिपाई सचिन शिगवण हा मागील चार दिवसांपासून येथून सामान घेऊन जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर रवींद्र पालेकर यांनी सचिन शिगवण याच्याविरुद्ध चोरीची तसेच घरफोडीची तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading