जुना कोपरी रेल्वे पुल मार्गावर २६ एप्रिल ते २१ मेपर्यंत वाहतुकीत बदल

ठाणे शहरातील जुना कोपरी रेल्वे पूल ते भास्कर कट येथील नवीन सब वे व भास्कर कट ते नवीन कोपरी रेल्वे ब्रिजचे सुरुवातीस खोदकाम करून डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने  २६ एप्रिल ते  २१ मे पर्यंत या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.

वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे :-

        प्रवेश बंद –  १) मुंबई (आनंदनगर चेकनाका) कडून फॉरेस्ट नाका-कोपरी सर्कल-जुना कोपरी रेल्वे ब्रिज मार्गे भास्कर कट कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जुना कोपरी रेल्वे ब्रिजचे सुरूवातीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            प्रवेश बंद – २) कोपरी गाव सिध्दार्थनगर कडून जुना कोपरी रेल्वे ब्रिज मार्गे भास्कर कट कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना – जुना कोपरी रेल्वे ब्रिजचे सुरूवातीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग – सदरची वाहने नवीन कोपरी रेल्वे ब्रिज वरून भास्कर कट मार्गे संत नामदेव ब्रिज वरून अथवा ब्रिज खालून इच्छित स्थळी जातील.

            प्रवेश बंद – ३) तीन हात नाका मुख्य रस्त्याने गुरूद्वारा मार्गे कोपरी सर्कल कडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना गुरूद्वारा कट येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग – सदरची वाहने आनंदनगर पोलीस चौकी येथून यू टर्न घेवून इच्छित स्थळी जातील.

            प्रवेश बंद – ४) तीन हात नाका सर्व्हिस रोडने रघुवीर हॉटेल कडून कोपरी सर्कल कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांना तुळजाभवानी मंदिर येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग – सदरची वाहने सुचिता सोसायटी कडून डावे बाजूस वळण घेवून इच्छित स्थळी जातील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading