शासनाच्या कोरोना विषयक निर्बंधांचं उल्लंघन केल्यास खाजगी व्यक्तींना ५०० रूपये तर आस्थापनांना १० हजार रूपये दंड ठोठावण्याचा इशारा ठाणे पोलीसांनी दिला आहे. नववर्षाचे स्वागत करण्याकरिता विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते. परंतु कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर नागरिकांनी गर्दी करू नये. तर नववर्षाचं स्वागत घरीच करावे. तसंच मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळावे अशा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करावे. अन्यथा दंड वसूल केला जाईल असं पोलीसांतर्फे कळवण्यात आलं आहे. तर एखादी आस्थापना स्वत:च कोविड आणि ओमिक्रॉन अनुरूप वर्तनाचे भंग करेल त्यांना ५० हजार रूपये दंड भरावा लागू शकतो.