गुढीपाडव्या निमित्त डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर बाईक रॅली चे आयोजन

गुढीपाडव्या निमित्त डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर बाईक रॅली चे आयोजन करण्यात आलं होत. डोंबिवलीत गुढीपाडव्या निमित्त काढण्यात येणारी नववर्ष स्वागत यात्रा म्हणजे डोंबिवलीकरांसाठी एक पर्वणीच असते. त्यातच यंदा या स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यंदाची स्वागत यात्रा मोठ्या उत्साहात निघणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभरापासून गणेश मंदिर संस्थानतर्फे सामाजिक, अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. श्री गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीने डोंबिवलीत बाईक – स्कुटर रॅली आयोजन केले होते. यात महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. महिलांनी साड्या घालून, फेटे बांधून बाईक – स्कुटर चालवली आणि आनंद व्यक्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading