शाळेला जात नाही म्हणून वडील ओरडल्यानं रागावलेल्या मुलीनं चक्क घर सोडल्याची धक्कादायक बाब

शाळेला जात नाही म्हणून वडील ओरडल्यानं रागावलेल्या १५ वर्षीय मुलीनं चक्क घर सोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तिच्यासोबत तिची १६ वर्षीय मैत्रिणही गायब झाली आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या दरम्यान देखील या दोघी मैत्रिणी घर सोडून गेल्या होत्या. पण नंतर दोन दिवसांनी घरीही परतल्या होत्या. ही १५ वर्षीय मुलगी नववीत शिकते. शाळेला जात नसल्यानं ती नेहमीच घरी असे. ९ डिसेंबरला सकाळी वडीलांनी मुलीला झोपेतून उठवून शाळेत का जात नाही असं खडसावलं. त्यावर मला शाळाच शिकायची नाही असे उत्तर तिने दिले आणि वडीलांशी भांडण करून रागाने घर सोडले. संध्याकाळपर्यंत मुलगी घरी न परतल्यानं तिच्या मैत्रिणीकडे शोध घेतला असता तिची १६ वर्षीय मैत्रिणही गायब असल्याचं उघडकीस आलं. दुस-या दिवशी तिच्या मैत्रिणीने आपल्या आजीला फोन करून घरी येण्याबाबत विचारले त्यावेळी आजीनंही खडसावल्यानं या दोघीही घरी परतलेल्या नाहीत. या दोघींनी इन्स्टाग्रामवर आजीच्या घरी जात असल्याची पोस्ट केली असल्यानं सांगलीला गावाकडील भाऊ आणि नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली पण तिथेही त्या गेल्या नसल्याचं लक्षात आलं. आता पोलीस या दोघींचा शोध घेत आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading