शालांत परीक्षा मार्च 2023 मध्ये भाषा विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

शालांत परीक्षा मार्च 2023 मध्ये भाषा विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या ठाणे शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांचा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सरस्वती सेकंडरी स्कूलचे विश्वस्त सुरेंद्र दिघे यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते. यावेळी संस्कृत विषयात 100 गुण प्राप्त करणाऱ्या ओम पणशीकर, निधी रहाटे, सात्यकी मुळये, भूमी भोजने (सरस्वती सेकंडरी स्कूल,), अनिका करंदीकर (सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज), अमृता बापट, विराज गोगटे, धानवी देशमुख, रुचिर दामले (ए.के.जोशी इंग्लीश मिडीयम स्कूल,) तर इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणारी निधी रहाटे गुण – 95 (सरस्वती सेकंडरी स्कूल,), मराठी (हायर लेवल) या विषयात श्रावणी सावळकर – गुण 96, (सरस्वती सेकंडरी स्कूल,),सार्थक जाधव गुण 96 (बाल विद्यामंदिर, किसननगर नं. 2), गुजराथी विषयात ट्विंकल सुतार – गुण 92 (टि. जे. स्कूल), हिंदी हायर लेवल या विषयात मानसी शुक्ला – गुण 91 (अश्ररुी देवी हिंदी हायस्कूल, रामचंद्र नगर 1) सिंधी हायर लेवल मध्ये शिजा रियाजुद्दीन शेख – गुण 95 (शोएब उर्दु हायस्कूल, मुंब्रा) तर विशेष मुलांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या अनशारी रिझवान अनवर हुसेन या विद्यार्थ्यांला देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिकेच्यावतीने रु 2,000/- चा धनादेश, सन्माचिन्ह प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading