शहर विद्रुपीकरण प्रकरणी दोन नागरिकांवर पालिका आयुक्तांकडून कारवाई

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, जन्म दाखल्यासाठी पैसे मागणे या सारख्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे शहराची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. आपल्या दौऱ्यातही आयुक्तांनी आणखी दोन नागरिकांवर कारवाई केली. ॲपलॅब कंपनीच्या चौकात पाहणी सुरू असताना एक रिक्षाचालक व्यक्ती, चित्रांनी सुशोभित केलेल्या भिंतींवर लघुशंका करताना आढळली. त्यांना जागेवरच दंड करण्याचे निर्देश आयुक्तांनी उपायुक्त शंकर पाटोळे यांना दिले. पाठोपाठ, वागळे इस्टेट येथे नाल्याची पाहणी सुरू असतानाच तिथेच रस्त्याच्या बाजूला लघू शंका करणाऱ्या दुसऱ्या नागरिकालाही दंड करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. शहर सुशोभिकरण, स्वच्छता मोहीम यातून शहरातील स्वच्छतेचे भान वाढविण्याचा पालिका आटोकाट प्रयत्न करत आहे. नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकताना, लघू शंका करताना, थुंकताना आपल्या शहराचा विचार करावा आणि अशा बेशिस्त वर्तनापासून दूर रहावे, असे आवाहनही पालिका आयुक्तांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading