शासकीय कार्यालये तसंच शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याची कार्यवाही करावी – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त घोषित करण्यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी जिल्हाधिका-यांनी हे निर्देश दिले. जिल्हा परिषद अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रे लवकरात लवकर तंबाखूमुक्त करण्याची कार्यवाही करावी. तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थानी आपल्या संस्थेचा परिसर तंबाखूमुक्त करावा. जिल्ह्यातील शासकीय तसेच निमशासकीय संस्थामध्ये तंबाखू मुक्त पेटी बसविण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. यावेळी उपस्थितांना तंबाखू मुक्त शपथ देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading