शहर फेरीवाला समितीची निवडणूक घेण्याची कामगार आयुक्तांकडे शिफारस

ठाणे शहरातील नोंदणीकृत फेरीवाल्यांची अंतिम यादी आता प्रसिध्द झाली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पुढे जाण्याच्या दृष्टीने शहर फेरीवाला समितीची निवडणूक घेण्याची शिफारस कामगार आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. तसेच, फेरीवाला यादी अद्ययावत करण्याचे काम सातत्याने सुरू राहील, अशी माहिती आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत दिली. फेरीवाला क्षेत्र कोणते, कुठे कारवाई होणार नाही, नोंदणीपत्र कधी मिळणार याबद्दल फेरीवाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे. तो दूर करण्यासाठी फेरीवाला धोरणाप्रमाणे चौथ्या टप्प्यातील कार्यवाही करण्याची आता गरज आहे. त्यानुसार, शहरातील १३६६ नोंदणीकृत फेरीवाल्यांच्या मतदानातून नवीन शहर फेरीवाला समिती लवकरात लवकर निवड करणे आवश्यक असल्याचे मत आयुक्त बांगर यांनी मांडले. तशी शिफारस आता कामगार आयुक्तांकडे करण्यात येईल. कामगार आयुक्त निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. शहर फेरीवाला समितीची सभा महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात झाली. या सभेस, समितीच्या ३० सदस्यांपैकी १७ सदस्य उपस्थित होते. या बैठकीत, समिती सदस्यांनी फेरीवाला नोंदणीपत्र मिळण्यातील अडचणी मांडल्या. दोन वर्षांत सर्वेक्षण झालेले नसल्याने फेरीवाल्यांची फेर सर्वेक्षणाची मागणी असल्याचेही सदस्यांनी बैठकीत सांगितले. सर्वेक्षण, प्रारुप यादी, अंतिम यादी ही प्रक्रिया झाल्यानंतर आता निवडणूक घेण्याची वेळ आलेली आहे. निवडून आलेली समिती शहर फेरीवाला आराखड्यानुसार, प्रभाग क्षेत्रनिहाय फेरीवाला क्षेत्रांची यादी तयार करेल. त्यामुळे नोंदणीकृत फेरीवाल्यांना त्यांच्या जागेची खात्री मिळेल. त्यातून सध्याची संभ्रमावस्था दूर होईल, असे आयुक्त बांगर म्हणाले. महापालिकेने फेरीवाल्यांना सन २०१८ मध्ये दिलेल्या काही नोंदणीपत्रांची मुदत २०२३ मध्ये संपत आहे. त्यांना मुदतवाढ देण्याचा तसेच, शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. फेरीवाला मग तो अधिकृत असो की अनधिकृत त्याने त्याच्या गाडी शेजारी कचराकुंडी ठेवायला पाहिजे. शहर फेरीवाला समितीनेही त्यासाठी आवाहन करावे. त्यातून स्वच्छता राखली जाईल, सगळ्यांना शिस्त लागेल, असे आयुक्त बांगर यांनी सांगीत

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading