आधीच पाण्याचा तुटवडा असताना नवीन हजारो रहिवाशांना पाणी कसे पुरवणार- संजय केळकर

ठाणे शहरात दिवसेंदिवस शहरीकरण होत असल्याने शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचा गैरफायदा घेऊन टँकर लॉबीने ठाणे शहरात कुत्रिम पाणी टंचाई निर्माण करून विविध सोसायट्यांना टँकरद्वारे पाणी घेण्यास भाग पाडण्याचे कारस्थान उघडकीस आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील घोडबंदर, वागळे इस्टेट, समतानगर, वर्तकनगर, सिध्देश्वर, जेल, तलाव, भागात पाणी पुरवठा होत नसल्याने तेथील सोसायट्यांना नाईलाजास्तव जास्त भावाने टँकरचे पाणी मागवावे लागत आहे. खाजगी टँकर पालिकेच्या वितरण व्यवस्थेकडून रू. ७००/- प्रमाणे पाणी उचलतात परंतू, सोसायट्यांना मात्र एका टँकरमागे रूपये ४ ते ७ हजार मोजावे लागतात. या गैरप्रकारात टँकर लॉबी बरोबर पाणी पुरवठ्याचे कार्यकारी आणि उप अभियंता सामिल आहेत की काय? असा सर्वसामान्य जनतेकडून विचारणा केली जात आहे. टँकर लॉबीकडून होणारी नागरिकांची लुटमार, यावर पाणी पुरवठा विभागातील अधिकार्यांचे जाणूनबुजून होणारे दुर्लक्ष या कारणामुळे उद्भवणार्या पाणी टंचाईतून नागरिकांची गळचेपी होत असल्याचे चित्र दिसत आहे. यासंदर्भात विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सुचनेच्या चर्चेमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी भाग घेतला. ठाणे शहरातील शाई आणि काळू धरण प्रकल्प प्रत्यक्षात आणून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्यास तसेच ठाणे शहरातून टँकर लॉबीचे उच्चाटन करण्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सभागृहाचे लक्ष वेधले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading