शहरातील स्वच्छतेसाठी महापालिका आयुक्त रस्त्यांवर – कचरा टाकण्याऱ्या दुकानांना जागेवरच दंड

स्वच्छता पंधरवडा निमित्त ठाणे शहर स्वच्छ करण्यासाठी सुरु असलेल्या साफसफाई कामाच्या पाहणीसाठी महापालिका आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरले असून आज शहरातील ज्या दुकानांसमोर कचरा आहे त्या सर्व दुकानांवर जागेवरच दंडात्मक कारवाई केली. आज कॅडबरी जंक्शन, खोटप रोड, एसटी स्टॅन्ड खोपट, एलबीएस मार्ग, गाव देवी माता मंदिर चौक, मखमली तलाव, अल्मेडा रोड, पाचपाखडी, रायगड अळी आदी ठिकाणांच्या साफसफाई कामाची महापालिका आयुक्तांनी पाहणी करून कचरा टाकणाऱ्या दुकानांवर दंडात्मक तात्काळ कारवाई केली. दरम्यान शहरातील साफसफाई कामात कोणाचीही गय केली जाणार नसून यापुढे रस्त्यांवर कचरा टाकणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी घनकचरा विभागाला दिले. 2 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा निमित्त शहरात जोरदार स्वच्छता मोहीम सुरु असून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे. सर्व प्रभाग समितीस्तरावरील अधिकाऱ्यामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम सुरु आहे. आज महापालिका आयुक्तांनी रस्त्यांवर उतरून शहरातील साफसफाई कामाची पाहणी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading