शहरातील पथविक्रेत्यांनी ”पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी” योजनेचा लाभ घेण्याचे महापालिकेचं आवाहन

शहरातील पथविक्रेत्यांनी ”पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी” योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. महापालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना महापालिकेच्या वतीने व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असून शहरातील पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कोविडमुळे पथविक्रेते, फेरीवाले यांच्या उपजिविकेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता आहे. यासाठी समाज विकास विभागाच्या वतीने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ठाणे महापालिकेला एकुण २२ हजार १०० लाभार्थ्यांचे उदिष्ट देण्यात आले असून यापैकी १९ हजार ७६९ इतक्या लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. त्यामधील ३ हजार ८९९ लाभार्थ्यांना बँकेकडून कर्ज मंजूर झाले असून शहरातील भाज्या फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा, भजी पाव, अंडी, कापड, वस्त्र, चप्पल, कारागिराद्वारे उत्पादित वस्तू, पुस्तके, स्टेशनरी इत्यादी व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading