शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सुरज वॉटर पार्कलगतच्या सेवा रस्त्यावर अचल वाहनांवर होडिंगसाठीचे अंदाजे ३० x २० चौरस फुट मोजमापाचे उभारण्यात आलेले अनधिकृत लोखंडी फॅब्रिकेशन गॅस कटरच्या सहाय्याने कट करण्यात आले. ब्रम्हांड येथील अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले शौचालयाचे बांधकाम तोडून येथील विटांचे रेबिट जेसीबी मशिन आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने हटविण्यात आले. तसेच नमिता पांडे, मनोरमानगर यांचे वाणिज्य १२ X १५ चौ. फुट मोजमापाची २ अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आलीत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading