पार्किंग प्लाझा कोव्हिड रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालयात जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ‘मानवतेसाठी योगा’ या सूत्रावर आधारित कोव्हिड रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर सहाय्यक कर्मचारी तसेच रुग्णालयातील उपचारार्थ दाखल असलेले कोव्हिड बाधित रुग्ण यात सहभागी झाले होते. योगप्रशिक्षक आधार कुलकर्णी यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्व, दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अत्यंत प्रभावी असे तात्काळ करता येणारे योगा प्रकार तसेच कोव्हिड रूग्णांनी करावयाचे योग प्रकार याबाबत प्रात्याक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले. कोविड बाधित रुग्ण यात मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते तसेच त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. पार्किंग प्लाझा या कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे मानसिक तसेच शारिरिक स्वास्थ्य नीट रहावे आणि रुग्णांचे मनोधैर्य वाढावे यासाठी नियमितपणे योगा सुरू करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading