शहरातील अनधिकृत फेरीवाले आणि हातगाड्यांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी अनधिकृतपणे उभे राहत असलेल्या फेरीवाले आणि हातगाड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत धडक कारवाई करण्याचे आदेश महापौर आणि महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर आज ठाणे आणि कळवा परिसरातील फेरीवाले, हातगाड्या आणि दुकानासमोरील फूटपाथ अडवून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
शहरात सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते 11 या दोन सत्रात कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणे स्थानक परिसर, मार्केट परिसर आणि नौपाडा कोपरी परिसरात कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान ठाणे मार्केट परिसरात 10 ते 12 हातगाड्या जप्त करण्यात आल्या तसेच मार्केट परिसरात दुकानांसमोरील फूटपाथवर विक्री करणाऱ्या 120 किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी सॅटिस परिसर, मार्केट परिसर आणि नौपाडा- कोपरी परिसरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटवून हा परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला. कळवा प्रभाग समितीअंतर्गत कळवा नाका, कळवा बाजारपेठ, कळवा पूर्व, विटावा, आत्माराम पाटील चौक, खारीगांव मार्केट परिसर, 90 फूट रोड या परिसरात कारवाई करण्यात आली. यात 18 हातगाडी विक्रेते तर दुकानांसमोर फूटपाथवर विक्री करणाऱ्या 45 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading