शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले

शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसून आले. सकाळी आव्हाड समर्थकांनी भुजबळांचा पुतळा जाळत आंदोलन केले तर त्याला उत्तर देताना अजित पवार गटाने शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयासमोर आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणा देत त्यांचा पुतळा जाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ यांचा पुतळा जाळला. यावेळी कार्यकर्त्याकडून भुजबळ यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. बीड येथे झालेल्या अजीत पवार गटाच्या सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. “साहेब म्हणतात, माझी चूक झाली, माफी मागतो. तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार, सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तुम्हाला जर माफी मागाची असेल तर ५४ ठिकाणी माफी मागावी लागेल” असे म्हणत अत्यंय जहरी टीका केली होती. त्याचे पडसाद ठाण्यात उमटले. सुहास देसाई म्हणाले की, भुजबळ यांच्यावर शरद पवार यांनी प्रचंड प्रेम केले होते. तुरुंगातून सुटल्यानंतरही भुजबळ यांना शरद पवार यांनी मंत्रीपद दिले. शरद पवार यांच्याकडून सर्व मिळवून मोठे झाल्यानंतर भुजबळ हे गद्दारी करीत असतील. तर आम्ही ते सहन करणार नाही. त्यांच्या या कृतीला आम्ही उत्तर देऊच, असा इशाराही देसाई यांनीही दिला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading