ऐरोलीतील टपाल कार्यालयाचे लोकार्पण करा – खा.राजन विचारे

ऐरोलीतील टपाल कार्यालयाचे लोकार्पण करा, अशी मागणी मुख्य पोस्टजनरल किशन कुमार शर्मा यांना खा.राजन विचारे यांनी लेखी निवेदन पाठवून केली आहे. खासदार राजन विचारे यांचे पत्र ऐरोली टपाल कार्यालयासाठी सिडकोकडून खरेदी केलेल्या भूखंडावर गेल्या १९ वर्षांत वस्तू उभारण्यात आली नव्हती. खा.राजन विचारे यांच्या पाठपुराव्याने ऐरोली सेक्टर १८ येथील भुखंड मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आधुनिक सुविधांसह तीन मजली टपाल कार्यालय उभारण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे पार्सल हब म्हणून ओळख निर्माण करणार्‍या या टपाल कार्यालयाचे लोकार्पण करावे, अशी मागणी खा.राजन विचारे यांनी केली आहे. कोपरखैरणे त्याच प्रमाणे ऐरोली सेक्टर-१७ येथील सिडको निर्मित वाणिज्य संकुलातील दोन गाळयामध्ये जीव मुठीत धरुन कर्मचारी ऐरोली टपाल कार्यालयाचे मागील २७ वर्षापासून कामकाज सुरु होते. विभागीय टपाल कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी ऐरोली सेक्टर १८ येथील भूखंड क्रमांक १ मिळाला होता. मात्र दिल्लीत टपाल विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत वर्षांनुवर्ष फाईल अडकली होती. खासदार राजन विचारे यांनी ऐरोली आणि वाशी येथील टपाल कार्यालयासाठी राखीव भूखंड मिळवण्यासाठी प्रयत्न केले. ऐरोलीतील मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या टपाल कार्यालयाची तळ मजल्यासह दुमजली प्रशस्त इमारत साकारली आहे.महाराष्ट्रातील सर्वात मोठे पार्सल हब या ठिकाणी असून दुमजली वस्तूत इतर सुुविधांनी परिपुर्ण कार्यालये आहेत.ऐरोलीतील या टपाल कार्यालयाचे काम पुर्ण झाले असून याचे लोकापर्ण करावे, अशी मागणी खा.विचारे यांनी केली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading