शनीच्या चंद्रांच्या संख्येत वाढ

आत्तापर्यंत शनीला ६२ चंद्र असल्याचं मानण्यात येत होतं. पण आता शनीला आणखी २० चंद्र खगोल शास्त्रज्ञांनी शोधून काढल्यामुळे शनीला एकूण ८२ चंद्र असल्याचं कॅरनेजी इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सचे डॉ. स्कॉट शेपर्ड यांनी जाहीर केल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. नव्याने शोधण्यात आलेले शनीचे २० चंद्र हे साधारणत: ५ किलोमीटर व्यासाचे असून ते उलट्या दिशेत शनीभोवती भ्रमण करत आहेत. आपल्या सूर्यमालेत जास्तीतजास्त चंद्र गुरू ग्रहाला आहेत असं समजलं जात होतं. पण आता तो मान शनीनं पटकावला आहे. आपल्या सूर्यमालेतील बुध आणि शुक्र ग्रहांना चंद्र नाहीत. पृथ्वीला एक, मंगळाला २, गुरूला ७९, शनीला ८२, युरेनसला २७, नेपच्यूनला १४ तर प्लुटोला ५ चंद्र असल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. आजची तारीखही मोठी गंमतीशीर आहे. ९/१०/२०१९ ही तारीख उलटी वाचली म्हणजे डावी अथवा उजवीकडून कशीही वाचली तरी ९/१०/२०१९ अशीच येते असंही सोमण यांनी सांगितलं. इंग्रजीमध्ये याला पॅलीनड्रोम म्हणतात. संस्कृत आणि हिंदीमध्ये याला विलोमपद असं म्हणतात.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading