ठाणे रेल्वे स्थानकातील वन रूपी क्लिनिकमध्ये पुन्हा एकदा महिलेची प्रसुती झाली असून या महिलेनं मुलाला जन्म दिला आहे. प्रसुतीच्या कळा सुरू झाल्यानं कर्जत येथील सुभान्ती पात्रा ही महिला मुंबईतील रूग्णालयात चालली होती. पण उपनगरीय गाडीमध्ये या कळांमध्ये वाढ झाल्यानं तिला ठाणे रेल्वे स्थानकात उतरवून वन रूपी क्लिनिकमध्ये नेण्यात आलं. तिथे तिची सुखरूप प्रसुती होऊन तिनं एका मुलाला जन्म दिला. आज सकाळी हा जन्म झाला. वन रूपी क्लिनिकमध्ये आत्तापर्यंत झालेली ही दहावी प्रसुती आहे.