शटडाऊनचा कालावधी कमी करून जलवाहिनी दुरुस्ती, रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे श्रीकांत शिंदेंचे निर्देश

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या शटडाऊनचा कालावधी कमी करून एमआयडीसी आणि महापालिका प्रशासनाने समन्वय साधून येत्या मार्च अखेर दुरुस्ती आणि रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले. दिवा-मुंब्रा परिसरात सुरू असलेल्या विविध कामांचा आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेवून ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत तसेच दर आठवड्यानी झालेल्या कामाचा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु टप्याटप्याने सुरु आहे. यासाठी घेण्यात येणाऱ्या नियोजित शटडाऊन नंतर वारंवार ब्रेक डाऊन झाल्यामुळे दिवा परिसरात अनियमीत पाणी पुरवठा होत आहे. याबाबत आज शिंदे यांनी एमआयडीसीचे आणि महापालिका प्रशासन यांची समवेत बैठक घेवून संपूर्ण कामाचा आढावा घेतला. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जलवाहिनी दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या शटडाऊनचा कालावधी कमी करून दोन्ही विभागाने समन्वय साधून विविध ठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेल्या पाईपलाईन दुरुस्तीची सर्व कामे येत्या मार्च अखेर काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. या बैठकीमध्ये श्रीकांत शिंदे यांनी दिवा विभागातील इतर विविध कामांचा आढावा घेतला. दिवा-मुंब्रा रस्त्याचा डी.पी.आर तयार करणे, बांधून तयार असलेले जलकुंभ कार्यान्वित करणे आदी कामे तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. तसेच दिवा-शिळ रोड, दिवा-आगासन रोड, दिवा बायपास, दातिवली रस्ता, साबे रोड, रेल्वे ओव्हर ब्रीज आदी रस्त्यांची कामे जलदगतीने व्हावीत या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले. शहरातील दिवा परिसर महत्वाचा भाग असून या विभागाच्या सर्वांगीण विकासाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली तसंच सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे मंजूर असणाऱ्या क्षमतेचा रीतसर पाणीपुरवठा ठाणे महापालिकेस करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्तांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading