वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, गावदेवी पार्किंग तसेच कळवा ब्रिजच्या कामाची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या साकेत, बाळकुम आणि कोपरी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, गावदेवी पार्किंग तसेच कळवा ब्रिजच्या कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी करून सर्वच कामांची गती वाढवून वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांसाठी मनोरंजनात्मक जागा विकसित करून पर्यटनास चालना देण्यासाठी महापालिकेच्या ठाणे स्मार्ट सिटी लि.अंतर्गत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या साकेत, बाळकुम आणि कोपरी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटच्या कामाची माळवी यांनी पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये कोपरी वॉटर फ्रंट येथील रस्त्याच्या दुभाजकाचे सुशोभीकरण, अँम्पी थेटरच्या कामाला गती देणे, उद्यान विषयक कामे तसेच संरक्षण भिंतीला ग्रील लावणे आदी कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच साकेत वॉटर फ्रंट येथील कामाची पाहणी करून या परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच गावदेवी येथील पार्किंग कामाची गती वाढविण्याचे निर्देश देतानाच कळवा ब्रिजचे कामही वेळेत पूर्ण करून दोन्ही मार्गिका लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ग्लोबल हॉस्पिटल आणि पार्किंग प्लाझा येथील अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठ्याचे कामही तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संदीप माळवी यांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading