वैशाख पौर्णिमेला काल आकाशात सूपरमूनचं दर्शन

काल सायंकाळी आकाशात सूर्य मावळल्यानंतर लगेचच आकाशात पूर्ण तेजाने तळपणारा चंद्र म्हणजेच सुपरमूनचे दर्शन झाले. या वर्षातील हा शेवटचा सुपरमून असल्यामुळे अनेकांनी हा सुपरमून पाहण्याचा आनंद लुटला. या नंतर पुढील वर्षी २७ एप्रिल रोजी सुपरमून पाहता येईल.
यावेळी चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो. त्यामुळे तो खूप तेजस्वी दिसतो म्हणून त्याला सुपरमून असे म्हणतात. पृथ्वी आणि चंद्राचे नेहमी अंतर सरासरी ३ लाख ८५ हजार किमी असते. परंतु, या दिवशी हे अंतर थोडे कमी असते म्हणून या दिवशी चंद्र जास्त प्रकाशमान दिसतो. पृथ्वीवरुन चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading