पाटण्याला जाणारी पहिली श्रमिक स्पेशल ट्रेन ठाणे रेल्वे स्थानकातून रवाना

ठाण्यातून पाटण्याला जाणारी पहिली श्रमिक स्पेशल ट्रेन काल संध्याकाळी ठाणे रेल्वे स्थानकातून रवाना झाली. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करत १२०० प्रवासी या रेल्वेतून पाटण्यासाठी रवाना झाले आहेत. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या नियोजनबध्द कार्यक्रमाअंतर्गत ही रेल्वे रवाना करण्यात आली. पोलीस दल आणि विविध मान्यवरांनी मदत केल्यामुळे आपल्याला आपल्या घरी जायला मिळत असल्याच्या भावना या कामगारांच्या डोळ्यातून दिसत होत्या. यावेळी कामगारांनी सर्वांचे आभार मानले असून त्यांचे अश्रू अनावर झाले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading