वैद्यकीय व्यवसाय हा केवळ विश्वासावर चालत असून हा विश्वास हरवू देऊ नका – डॉ. विजय बेडेकर

वैद्यकीय व्यवसाय हा केवळ विश्वासावर चालत असून हा विश्वास हरवू देऊ नका असा सल्ला डॉ. विजय बेडेकर यांनी नवीन वैद्यकीय व्यावसायिकांना दिला. डॉ. विजय बेडेकर यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या समाजोपयोगी कृतार्थ जीवनकार्याचा अमृत वंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. बेडेकर यांना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुध्दे यांच्या हस्ते मराठी आणि संस्कृतमधील सन्मानपत्र देण्यात आलं त्यावेळी बोलताना डॉ. बेडेकर यांनी हा सल्ला दिला. या कार्यक्रमात डॉ. विजय बेडेकर यांच्या कार्यावरची एक चित्रफीत प्रसारीत करण्यात आली. तसंच डॉ. बेडेकर यांनी गेल्या २५ वर्षात दिशा मासिक तसंच सद्धर्म त्रैमासिकासाठी लिहिलेल्या संपादकीय लेखांच्या खंडांचं प्रकाशन विनय सहस्रबुध्दे आणि श्रीकांत बहुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं. डॉक्टर रूग्ण संबंध हे केवळ विश्वासावर चालतात. हे सांगताना केवळ काही रूग्ण हे डॉक्टरांवरील विश्वासामुळेच बरे झाले. साधारणपणे रूग्णाला त्याच्या आजारावर एकच औषध दिलं जातं पण काही हाताबाहेर गेलेले रूग्णही फक्त विश्वासाने बरे झाल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टरांवर असलेल्या रूग्णांच्या विश्वासाला कुठेही हरवू देऊ नका हा विश्वास हरवला तर परिस्थिती कठीण होऊन बसेल असे विचार या सोहळ्यात बोलताना डॉ. विजय बेडेकर यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading