विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम – सर्व केंद्रात सकाळी 9 ते 4 या वेळेत सुरू राहणार

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांमध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम ही लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात या मोहिमेस 7 ऑगस्टपासून सुरूवात झाली असून दिनांक 12 ऑगस्टपर्यत ही मोहिम महापालिकेच्या सर्व केंद्रात सकाळी 9 ते 4 या वेळेत सुरू राहणार आहे. आरोग्य ठाणे महानगरपालिकेच्या सर्व आरोग्‌यकेंद्रात या सर्व लसी मोफत दिल्या जाणार असून या मोहिमेचा लाभ 0 ते 5 वयोगटातील बालकांनी व गर्भवती मातांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्‌त अभिजीत बांगर यांनी केले आहे. मोहिमेसाठी अतिजोखमीच्या क्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर माता यांचे सर्वेक्षण करीत आहेत. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात अद्यापपर्यत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 7736 बालकांचे आणि 1481 गर्भवती मातांचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे माहिती माता बाल संगोपन अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी दिले. मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची विशेष मोहिम राबविताना लसीकरणानंतर बाळाला ताप येणे, इंजेक्शनच्या जागी गाठ येणे आदी बाबींचा समावेश आहे. लसींमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे प्रमाण अत्यंत किरकोळ असून या कारणांसाठी आपल्या बाळाला लस न देणे योग्य नाही. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लसी बालकांचे क्षयरोग, काविळ, पोलिओ, डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, गोवर, हिमोफिलस, इन्फल्युएंझा बी या जीवघेण्या आजारांपासून संरक्षण करीत असून बाळाला लसीकरणापासून वंचित ठेवू नये असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितिल यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading