राष्ट्रीय जलतरण निवड चाचणी मध्ये ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी बक्षीसांची लयलूट

पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण निवड आणि फिंन्सस्विमिंग राष्ट्रीय जलतरण निवड चाचणी मध्ये ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी बक्षीसांची लयलूट केली आहे. तसेच या जलतरणपटूंची 16 ते 23 ऑगस्ट 2023 रोजी भुवनेश्वर ओरिसा आणि बालेवाडी येथे ३ ते ५ सप्टेंबर यादरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. राष्ट्रीय जलतरण निवड आणि फिंन्सस्विमिंग राष्ट्रीय जलतरण निवड चाचणी मध्ये विविध वयोगटातील जलतरणपटू सहभागी झाले होते. या चाचणीत झालेल्या जलतरण स्पर्धेत 10 वर्षे वयोगटात निधी सामंत हिने सुवर्णपदक तर फ्रेया शहा हिने रौप्यपदक पटकाविले. फिंन्सस्विमिंग जलतरण स्पर्धेत 11 वर्षे वयोगटात युवराज राव याने सुवर्ण तर तृणांश गंद्रे यांनी 1 रौप्यपदक प्राप्त केले. 11 वर्षे वयोगटात फ्रेया शहा हिने 4 सुवर्णपदक, श्रुती जांभळे हिने 2 रौप्य आणि 1 कांस्य तर माही जांभळे हिने 3 कांस्यपदक पटकाविली. तर 12 वर्षे वयोगटात परीन पाटील याने 4 सुवर्ण, आयुष तावडे याने 1 सुवर्ण, सोहम पाटील याने 1 रौप्य तर आयुषी आखाडे हिने 2 रौप्य आणि 2 कांस्यपदके पटकाविली. 14 वर्षे वयोगटात सोहम साळुंखे याने 4 सुवर्णपदके प्राप्त केली. तर 18 ते 25 या वयोगटात श्रवण पेठे यांनी 2 सुवर्णपदकासह 1 कांस्यपदक पटकाविले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading