विवियाना मॉल ठाणे महापालिकेला १० टन मोफत सेंद्रीय खत पुरवणार

ठाण्यातील विवियाना मॉल ठाणे महापालिकेला १० टन मोफत सेंद्रीय खत पुरवणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महापालिकेला किमान १० टन सेंद्रीय खताचा मोफत पुरवठा करण्याची प्रतिज्ञा विवियाना मॉलने घेतली आहे. विवियाना मॉलच्या फूड कोर्ट आणि रेस्टॉरंटमधून उरलेल्या अन्नापासून तयार करण्यात आलेलं खत संपूर्णत: सेंद्रीय असून या माध्यमातून महापालिकेच्या बगिच्यांमधील झाडं आणि रोपांचं पोषण आणि व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या सेंद्रीय खतामुळे शहरातील हिरवळ टिकण्यास मदत होणार आहे. मेट्रो पोलिटियन शहरांमध्ये वृक्ष लागवड करणं महत्वाचं असून परिसरातील हिरवाई जपणं हे तितकंच आवश्यक आहे. गेल्या ४ वर्षात ६ लाख झाडं लावण्याच्या महापालिकेच्या मेगा वृक्षारोपण उपक्रमाला यामुळे हातभार लागणार आहे. तसंच हा उपक्रम अन्य मॉलसाठी आदर्श ठरणार असून महापालिकेचा उद्यान व्यवस्थापन आणि लँडफिल्सवर होणारा खर्च यामुळं कमी होणार आहे. विवियाना मॉलमधील सेंद्रीय कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं आणि खतांचं सखोल परिक्षण महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading