विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणी निगा- देखभालीसाठी विविध समित्या गठीत करण्याचा आयुक्तांचा निर्णय

ठाणे महापालिकेच्या वतीनं ज्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं अशा प्रकल्पांची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी व्हावी तसंच त्याबाबत योग्य ते धोरण ठरवता यावं आणि त्या प्रकल्पांची देखभाल योग्यरितीनं व्हावी यासाठी महापालिका आयुक्तांनी विविध समित्या गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी उपायुक्त संदीप माळवी, मुख्य लेखा परिक्षक तायडे, उपनगर अभियंता प्रमोद निंबाळकर आणि कार्यकारी अभियंता मोहन कलाल, आपला दवाखाना प्रकल्पासाठी उपायुक्त मनिष जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. माळगावकर, कार्यकारी अभियंता शैलेंद्र बेंडाळे, ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब या प्रकल्पासाठी उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, मनिष जोशी, अशोक बुरपुल्ले, प्रमोद निंबाळकर आणि गोदेपुरे, बांधकाम आणि तोडफोड कचरा पुनर्प्रक्रिया प्रकल्पासाठी उपायुक्त मनिष जोशी, अशोक बुरपुल्ले, प्रवीण पापलकर, डॉ. हळदेकर, मनिषा प्रधान, घनकच-यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी उपायुक्त मनिष जोशी, मुख्य लेखापरिक्षक तायडे, कार्यकारी अभियंता शुभांगी केसवाणी, कमांड अँड कंट्रोल सेंटर या प्रकल्पासाठी विकास ढोले, भेंडाळे, शुभांगी केसवाणी, रूपेश पाडगावकर, गोदपुरे तर दिव्यांग स्टार योजनेसाठी अशोक बुरपुल्ले, अर्जुन अहिरे, शंकर पाटोळे, महेश अहेर, वाघमारे आणि दयानंद गुंडप यांची समिती नेमण्यात आली आहे. या सर्व समित्या अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading