ठाण्यातील ८ बोगस डॉक्टरांवर पोलीसांची कारवाई

ठाण्यामध्ये ८ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. कळवा परिसरात बोगस डॉक्टर कार्यरत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकानं कळव्यातील ८ बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा परवाने नसताना कळवा, मुंब्रा, डायघर आणि दिवा परिसरात बेकायदेशीररित्या दवाखाना थाटून रूग्णांच्या जीवाशी खेळलं जात होतं. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकानं महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीनच्या सहाय्यानं कळव्यातील भास्करनगर, वाघोबानगर येथे विविध क्लिनिकवर छापा टाकण्यात आला. यावेळी ८ बोगस डॉक्टर कुठलीही वैद्यकीय परवानगी नसताना रूग्णांना इंजेक्शन, सलाईन तसंच औषधोपचार करताना आढळून आले. याप्रकरणी आलोक सिंह, रामजित गौतम, गोपाळ विश्वास, रामतेज प्रसाद, सुभाषचंद्र यादव, जयप्रकाश विश्वकर्मा, दीपक विश्वास, सत्यनारायण बिंद अशा ८ बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading