राज्यातील स्वराज्य संस्थांमध्ये तृतीय पंथीयांना सुरक्षारक्षकाची नोकरी मिळणार

पुणे महानगपालिकेच्या धर्तीवर राज्यातील इतर जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महानगरपालिकांमध्ये तृतीय पंथीयाना मिळणार सुरक्षा रक्षकांची नोकरी मिळणार आहे. आपल्या समाजातील तृतीय पंथीय म्हणजेच किन्नरांच्या विविध मागण्यांचा विचार करून त्यांना समाजामध्ये सन्मानाने जगता यावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी मांडून विधानसभेचे लक्ष वेधले. त्यावेळी लक्षवेधीला सकारात्मक उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्यातील तृतीय पंथीय या समाज घटकांची सर्वांगीण उन्नती व्हावी आणि त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणण्यासाठी राज्य आणि विभागीय स्तरावर राज्यातील तृतीय पंथीय कल्याणासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करणेबाबतचा शासन निर्णय …..किन्नर लोकांना समाजात बहिष्कृत केले जाते किंवा वाईट वागणूक मिळते, त्यांना पोलीस भरती प्रक्रियेत शारिरीक चाचणी निकष शिथिल करून सामावून घेण्यात येणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तृतीयपंथीयांसाठी ठिकठिकाणी स्वतंत्र प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच त्यांना राष्ट्रीय सुरक्षा येजनेचा लाभ देण्यासाठी पात्रतेनुसार योग्य ती शिधापत्रिका देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण करणे, नोंदणी करणे, ओळखपत्रे देणे, मतदार ओळखपत्र देणे, जाणीव-जागृती कार्यशाळा आणि आरोग्य शिबीरांचे आयोजन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading