विजय सेल्समध्ये चोरी करणा-या चोरट्यास अटक

ठाण्यातील विजय सेल्स या दुकानातून मोबाईल चोरणा-या एका चोरट्याला वागळे इस्टेट पोलीसांनी अटक करून त्याच्याकडून १ लाख २२ हजार रूपये किंमतीचे ४ मोबाईल मिळवण्यात यश मिळवलं आहे. चेकनाक्याजवळील विजय सेल्स या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानातून एका चोरट्याने ३० जूनला रात्रीच्या सुमारास काच फोडून ८ मोबाईल चोरून नेले होते. यामध्ये अॅपल कंपनीचे ३, ओप्पोचा १ आणि ५ सॅमसंग कंपनीचे असे एकूण २ लाख ८२ हजारांचे मोबाईल होते. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीसांकडे तक्रार करण्यात आली होती. पोलीसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून संशयिताचा शोध घेऊन तुषार नावाच्या चोरास अटक केली. त्याची चौकशी केली असता तो मूकबधीर असल्याचं लक्षात आलं. त्यामुळं पोलीसांना तपास करताना थोडी अडचण येत होती. त्यासाठी पोलीसांना कर्णबधीरांची भाषा समजणा-यास बोलवावं लागलं. मोठ्या कौशल्याने त्याचा तपास करून त्याच्याकडून ४ मोबाईल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आलं. हे मोबाईल १ लाख २२ हजार रूपये किंमतीचे असल्याचं पोलीसांकडून सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading