विचारे यांना १ लाख ८० हजार तर शिंदे यांना १ लाख ८१ हजार आणि पाटील यांना ६१ हजार तर गावित यांना ८८ हजारांची आघाडी

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना १ लाख ८० हजार ४८३
मतांची आघाडी मिळाली आहे.

३ वाजून १० मिनिटांनी हाती आलेल्या
आकडेवारीनुसार राजन विचारे यांना २ लाख ८२ हजार ५७६ तर आनंद परांजपे यांना
१ लाख २ हजार ९३ मतं मिळाली आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना १ लाख ८१ हजार
५२३ मतांची आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांना २ लाख ५१ हजार ४४५ तर
बाबाजी पाटील यांना ६९ हजार ९२२ मतं मिळाली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ६१ हजार
४० मतांची आघाडी मिळाली आहे. कपिल पाटील यांना २ लाख २० हजार ५७ तर
काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना १ लाख ५९ हजार १७ मतं मिळाली आहेत.

पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित ८८ हजार ५०९ मतांनी आघाडीवर
आहेत. राजेंद्र गावित यांना ५ लाख ७५ हजार ९५६ मतं तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना ४ लाख ८७ हजार ४४७ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading