विकेंड लॉकडाऊन मध्ये रस्त्यावर वाहनं घेऊन फिरणा-यांची वाहनं जप्त करण्याचा पोलीस आयुक्तांचा इशारा

आजपासून राज्यभर विकेंड लॉकडाऊन लागू होणार असून या दरम्यान अनावश्यक बाहेर पडणं टाळावं असं आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केलं आहे. आजच्या विकेंड लॉकडाऊनबाबत बोलताना पोलीस आयुक्तांनी हे आवाहन केलं. या लॉकडाऊन दरम्यान विद्यार्थी एखाद्या परीक्षेसाठी जाणार असेल तर त्याला अडवलं जाणार नाही मात्र त्यानं परीक्षेसाठी आवश्यक असणारं ओळखपत्र जवळ बाळगणं गरजेचं असल्याचं फणसळकर यांनी सांगितलं. कोणालाही विनाकारण आणि अत्यावश्यक कामाशिवाय रस्त्यावर येता येणार नाही. लॉकडाऊन दरम्यान टेक-अवे सर्व्हीसेस बंद असतील मात्र ऑनलाईन पध्दतीनं आवश्यक गोष्टी मागवता येतील. रस्त्यावर विनाकारण फिरताना कोणी दिसल्यास अथवा वाहनांवरून फिरताना कोणी आढळल्यास अशांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला. वाहनं घेऊन फिरणा-यांविरूध्द प्रसंगी वाहन जप्तीची कारवाई होऊ शकते. तसा विचार सुरू असल्याचं सांगून नागरिकांचं सहकार्य अपेक्षित असल्याचंही पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading