येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच परीक्षा फॉर्म भरतानाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाची अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलावी अशी विद्यार्थ्यांचीही मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading