वाहतूक शाखेच्या पोलिसांना अत्याधुनिक ई-चलन यंत्र

वाहतूक शाखेच्या पोलिसांना अत्याधुनिक यंत्र देण्यात आली आहेत. यापूर्वी 2019 मध्ये इ चलन यंत्र देण्यात आली होती. मात्र या ई चलन यंत्रामध्ये असलेल्या उणिवा नवीन यंत्रात दूर करण्यात आल्या आहेत. ठाणे वाहतूक शाखेतील सर्व पोलिसांना ही यंत्र देण्यात आली आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विनोद राठोड यांच्या हस्ते ही यंत्र आज वाहतूक शाखेच्या पोलिसांना प्रदान करण्यात आली. या नवीन यंत्रामध्ये अत्याधुनिक कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये फोटो बरोबरच व्हिडिओही काढता येतो. या नवीन यंत्राला प्रिंटरही देण्यात आला आहे. या नवीन यंत्रामध्ये झूम सुविधाही देण्यात आल्यामुळे अगदी लांबून येणाऱ्या वाहनांचाही छायाचित्र काढता येणार आहे. या नवीन यंत्रामध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्डचाही उपयोग करता येणार आहे. पूर्वीच्या मशीनमध्ये काही क्रेडिट कार्ड बाबत तक्रारी होत्या मात्र यात सर्व सुधारणा करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading