आषाढी एकादशी आणि ईदच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. येत्या गुरूवारी म्हणजे २९ जून रोजी आषाढी एकादशी आणि ईदच्या पार्श्वभूमीवर ठाणे नगर पोलिसांच्या वतीने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रूट मार्शल चे आयोजन करण्यात आले होते. त्याच बरोबर शांतता राखण्याचे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले.