वाहतूक पोलीसाच्या अंगावर रिक्षा घालणा-या रिक्षा चालकास अटक

वाहतूक पोलीसाच्या अंगावर रिक्षा घालणा-या रिक्षा चालकास पोलीसांनी अटक केली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणा-या रिक्षा चालकाविरोधात कारवाई करण्यास गेलेल्या वाहतूक पोलीसाच्या पायास ठोकर मारून रिक्षा चालकानं धूम ठोकली. मात्र वाहतूक पोलीसांनी या रिक्षा चालकाचा पाठलाग करून त्याला पकडलं असता त्याने आपल्याला सोडा अन्यथा स्वत:चा गळा कापून घेण्याची धमकी वाहतूक पोलीसांना दिली. ठाणे वाहतूक उपविभागात कार्यरत असलेले योगेश पाटील हे सिडको बस स्टँड येथे वाहतुकीचं नियमन करत होते. त्यावेळी शराफत अली शेख या रिक्षा चालकानं रस्त्यावरच रिक्षा उभी केली होती. त्यावेळी पाटील यांनी त्याच्याकडे वाहन परवान्याची मागणी केली. तेव्हा शेखनं आपली रिक्षा सुरू करून विरूध्द दिशेनं धूम ठोकली. या पळापळीत त्याने पाटील यांच्या डाव्या पायाला धडक दिली. पण पोलीसांनी या रिक्षा चालकाचा पाठलाग करून त्याला पकडलं. यावेळी त्याने गळा कापून घेण्याची धमकी दिली पण तरीही पोलीसांनी त्याला अटक केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading