लोखंडी रेलिंगचा साचा अंगावर पडल्यामुळे रेलिंगमध्ये अडकलेल्या व्यक्तीला स्थानिक कर्मचा-यांनी काढले बाहेर

लोखंडी रेलिंगचा साचा अंगावर पडल्यामुळे रेलिंगमध्ये अडकलेल्या व्यक्तीला स्थानिक कर्मचा-यांनी बाहेर काढले.
काल दुपारच्या सुमारास खारेगाव टोलनाक्याजवळ असलेल्या मुंबई-नाशिक हायवेच्या ब्रिजच्या कामासाठी उभारण्यात येणारा लोखंडी रेलिंगचा साचा दीपक ब्रिजीया या युवकाच्या अंगावरती पडल्यामुळे लोखंडी तो रेलिंगमध्ये अडकला होता. ही माहिती कळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान पोहचण्यापूर्वीच स्थानिक कर्मचाऱ्यांनी खाजगी हायड्राच्या साह्याने लोखंडी रेलिंग उचलून या व्यक्तीस छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दीपक ब्रिजीया याच्या डाव्या पायाला आणि कमरेला किरकोळ दुखापत झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading