वाघबीळ येथील श्री साई प्युअर व्हेज हॉटेलला लागलेल्या आगीत ३ कामगार जखमी

वाघबीळ येथील श्री साई प्युअर व्हेज हॉटेलला लागलेल्या आगीत ३ कामगार जखमी झाले आहेत. हरीश सालियन यांच्या या हॉटेलमध्ये अडकलेल्या ०३-कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दीपक दास हाताला किरकोळ दुखापत तर अमर देसाई यांच्या चेहऱ्यावरती किरकोळ दुखापत झाली आहे. महेश मोकल डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. श्री साई प्युअर व्हेज हॉटेलमधून एकूण-०७ कमर्शियल भारत गॅस सिलेंडर आणि ०१-डोमेस्टिक भारत गॅस सिलेंडर बाहेर काढून अग्निशमन दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांच्या मार्फत हॉटेलमध्ये लागलेली आग सव्वा नऊच्या सुमारास पूर्णपणे विझवीण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading