वाघबीळ तसेचं ओवळा स्थानकाची नावं बादलली जाणार

मेट्रोच्या वाघबीळ आणि ओवळा या स्थानकांची नावं बदलण्यास मुंबई महानगर विकास प्राधीकरणाच्या आयुक्तांनी मान्यता दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त श्रीनिवासन यांची भेट घेऊन गायमुख कासारवडवली ते वडाळा मेट्रो-४ या मेट्रोच्या कामासंदर्भात तसेच वाघबीळ, ओवळा या गावातील मेट्रो स्टेशनच्या नावासंदर्भात चर्चा केली. काही दिवसांपूर्वी वाघबीळ गाव आणि ओवळा गाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन विजय गार्डन मेट्रो स्टेशन नावाऐवजी वाघबीळ गाव मेट्रो स्टेशन आणि ओवळा येथील गोवन पाडा या मेट्रो स्टेशनचे नाव ओवळा मेट्रो स्टेशन करणेसंदर्भात भेट घेतली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करून ज्या भुमिपुत्रांनी आपल्याला जमिनी कुठलाही मोबदला न घेता अथवा कवडीमोल भावाने शासनाला विकास कामासाठी दिल्यानंतर जर त्यांच्या वाघबीळ आणि ओवळा गावाचे गावपण ही टिकणार नसेल तर आम्हाला आंदोलन करावे लागेल, अशी भुमिका घेतली होती त्यानुसार आमदार प्रताप सरनाईक यांनी दोन्ही नावे बदलण्यासंदर्भात एम.एम.आर.डी.ए.च्या आयुक्तांना पत्र दिले होते. त्याअनुषंगाने आयुक्त श्रीनिवासन आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या झालेल्या बैठकीमध्ये विजय गार्डन ऐवजी वाघबीळ मेट्रो स्टेशन तसेच गोवन पाडा ऐवजी ओवळा मेट्रो स्टेशन असे नामकरण करण्यास आयुक्त श्रीनिवासन यांनी मान्यता दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading