तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव संदीप ओंबासे यांची आशियाई तायक्वांदो युनियन संघटनेच्या वित्त आयोग समिती सदस्यपदी नियुक्ती

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव संदीप ओंबासे यांची आशियाई तायक्वांदो युनियन संघटनेच्या वित्त (फायनान्स) आयोग समिती सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. नाशिक येथील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेच्या दरम्यान इंडिया तायक्वांदो अध्यक्ष आणि महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन चे महासचिव शिरगावकर आणि इंडिया – कोरिया जागतिक तायक्वांदोचे समन्वयक किराश बेहेरा यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
आशियाई तायक्वांदो युनियनच्या विकासासाठी विविध उपक्रम अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या तायक्वांदो खेळाच्या सुविधा आणि व्यवस्था याचे आर्थिक नियोजन आणि आयोजन सू व्यवस्थित होण्यासाठी आणि ओंबासे यांनी तायक्वांदो या खेळासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांची निवड केल्याचे आशियाई तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष क्यू सीओक ली यांनी सांगितले. ओंबासे यांनी आतापर्यंत २२ राज्यस्तरीय , ८ राष्ट्रीय, आणि २ आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading