वागळे इस्टेट येथील हनुमान नगरमधील चाळीतील एका घराची भिंत पडल्याची घटना

वागळे इस्टेट येथील हनुमान नगरमधील चाळीतील एका घराची भिंत पडल्याची घटना आज घडली. आज दुपारी २ च्या सुमारास संतोषीमाता चाळीतील एका घराची २० फूट लांबीची भिंत पडली. हे घर जगतनारायण यादव यांच्या मालकीचं असून उर्वरीत ३० फूट भिंतीचा भाग धोकादायक स्थितीमध्ये आहे. ही भिंत पडल्यामुळे बाजूला असलेलं घरही धोकादायक झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी महापालिकेचे अभियंता तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचा-यांनी सुरक्षेच्या दृष्टीने धोकापट्टी लावून बॅरिगेटिंग केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading