वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांच्या उपस्थित ‘रेझींग डे’ साजरा

देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलिस विभागास ध्वज सुपूर्त केला होता. केंद्र सरकारने हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे (ध्वज प्रदान दिन) म्हणून घोषित केला. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन जानेवारी ते आठ जानेवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून पोलीस ‘रेझींग डे’ सप्ताह साजरा केला जातो. यानिमित्ताने आनंद विश्व गुरूकुल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यांना पोलीस खात्याचे विभागीय कामकाज, शस्त्रांची माहीती देण्यात आली. २४ तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचे कामकाज कसे चालते याविषयी विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोलीस ठाण्यांना भेट आयोजित केल्या आहेत. असे सप्ताह विषयी बोलताना ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी सांगितले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांनी मोबाईल चोरी गेल्यावर उपाय,ऑनलाईन फसवणुकीपासून सावधानी कसे बाळगावी याचे धडे दिले. वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी वाहतूकीचे नियम पाळले नाही तर त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून त्यावर आकारल्या जाणाऱ्या दंडांची माहिती दिली. तसेच पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांनी शस्त्रांची माहिती देऊन, विभागीय कामकाजाची माहिती दिली. अंमली पदार्थ विभागाचे पोलीस हवालदार अनिल पटेकर यांनी सिंम्बा (श्वान) याची ओळख करून त्या दोघांमधील बंधन विद्यार्थ्यांना दाखवून दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading