वसंत लॉन्सच्या समोरील न्यू होरायझन स्कूलच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या ३ चारचाकी वाहनांना आग

ठाण्यातील वसंत लॉन्सच्या समोर असलेल्या न्यू होरायझन स्कूलच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या ३ चारचाकी वाहनांना आज दुपारच्या सुमारास आग लागली होती. या घटनेची माहिती कळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या कर्मचा-यांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. आज दुपारी दीडच्या सुमारास वसंत फिओना सोसायटीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरील ३ वाहनांना आग लागली होती. यामध्ये सोमनाथ सकट यांची टोयोटा क्वालिस, महिंद्रा झायलो आणि परवेश चौधरी यांच्या इनोव्हा गाडीला आग लागली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन ही आग पूर्णपणे विझवली. यामध्ये कोणलाही दुखापत झाली नसल्याचं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading