वर्सोवा पुलाच्या बांधकामास दोन वर्षाचा कालावधी लागणार

मुंबई आणि ठाणे, वसई, मीरा-भाईंदर तसेच उपनगरीय शहरातील महानगरपालिका क्षेत्रात जोडणारा अत्यंत महत्वाचा मुंबई-अहमदाबाद मार्गावरील नॅशनल हायवे 48 वर्सोवा येथील नवीन पुलाच्या कामाच्या बांधकामाचे 11 जानेवारी 2018 रोजी झालेल्या भूमीपूजनानंतरही पर्यावरण विभागाच्या परवानगी मिळाली नसल्याने या पुलाचे बांधकामास प्रत्यक्षात सुरू झाले नव्हते. या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी मुळे नागरिकांना याचा होणार त्रास कमी व्हावा यासाठी या पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक लागणाऱ्या सी आर झेड, कांदळवन, वनखात्याची, सर्व परवानग्या मिळवून घेण्यासाठी झटणारे खासदार राजन विचारे यांनी या पुलाच्या बांधकामासाठी सर्व अंतिमपरवानग्या 29 एप्रिल रोजी प्राप्त करून दिल्या होत्या. परंतु हे काम सुरू झाले की नाही याची खातरजमा करण्यासाठी  या पुलाची पाहणी आमदार प्रताप सरनाईक आणि नॅशनल हायवेचे 48 जनरल मॅनेजर शशीभूषण तसेच त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत केली. या पुलाच्या दोन्ही बाजूचे काम का पूर्ण करण्यास विलंब का लागत आहे. याची विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून जो पर्यंत पुलाचे काम होत नाही तो पर्यंत या पुलाला जोडणाऱ्या दोन्ही मार्गाचे काम सुरु होत नाही अशा तांत्रिक बाबी खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. हा प्रकल्प २.२५ किमी. लांबीचा असून त्यामध्ये या पुलाची लांबी 9१७ मीटरची आहे. हा पूल चार लेनचा असल्याचे समजते. या पुलाच्या बांधकामासाठी 157 कोटीची तरतूद केंद्र शासनाकडून करण्यात आलेली आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यास दोन वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून खा. विचारे यांना सांगण्यात आले. या ४ लेनच्या नवीन पुलावरून ठाणे आणि मुंबईकडून अहमदाबाद मार्गास जाणाऱ्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच जे दोन जुने पूल आहेत या पुलावरून मुंबई आणि ठाणे या दिशेस असणारी मार्गिका राहणार आहेत असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading