वर्तमानपत्र विक्रेत्यांवर कारवाई न करण्याचं अतिरिक्त आयुक्तांच आश्वासन

ठाण्यातील वर्तमानपत्र विक्रेत्यांनी केला ठाणे महापालिकेचा काळ्याफिती लाऊन निषेध केला. ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने व्रूतपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर कारवाई केल्याच्या
निषेधार्थ आज ठाणे शहरातील सर्व वर्तमानपत्र विक्रेत्यांनी ठाणे महानगरपालिकेवर मोर्चा काढून काळ्याफिती लाऊन पालिका प्रशासनाचा निषेध केला.ठाणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण
विभागाने पाचपाखाडी भागातील मंगेश नामक व्रूतपत्र विक्रेत्याचा स्टॉल तोडला होता.या घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर व्रूतपत्र विक्रेता अशोशिएशनचे दत्ता घाडगे , दिलीप चिंचोले , बंटी म्हात्रे
यांच्यासह ठाणे आणि मुंबईतील अनेक वर्तमानपत्र विक्रेता संघटनेचे पदाधीकारी यांनी निवेदन दिले. यावेळी पालिकेचेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी यापुढे वर्तमानपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही असे सांगुन तिन दिवसात तसे आदेश काढू असे आश्वासन दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading