लोढा अमरा गृहसंकुलातील एका महिलेचा प्रजासत्ताक दिनी गोंधळ

ठाण्यातील एका गृहसंकुलात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमा दरम्यान एका महिलेनं बराच गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कोलशेत परिसरातील लोढा अमारा या गृहसंकुलात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतमातेची प्रतिमा उचलून या महिलेनं गोंधळ घातला. या गृहसंकुलाच्या सुरक्षा रक्षकांनी या महिलेच्या हातातून भारतमातेची प्रतिमा घेण्याचा बराच प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. एका महिला सुरक्षा रक्षकानं भारतमातेची प्रतिमा या महिलेच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न केला असता या महिलेनं अधिक आक्रस्ताळेपणा करून या महिला सुरक्षा रक्षकावरच हल्ला चढवला. तिचे केस पकडून तिला जोरदार धक्काबुक्की केली. यावेळी इतर सुरक्षा रक्षकही मध्ये पडण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांनाही या महिलेनं मारहाण केली. हा सर्व प्रकार मोबाईलवर एक सुरक्षा रक्षक चित्रीत करत होता. हे पाहून या महिलेनं आणखी संतप्त होत त्याच्या हातातील मोबाईल घेऊन फोडला. अखेर पोलीसांना पाचारण करण्यात आलं. पोलीसांनी महिलेच्या विरोधात आता गुन्हा दाखल केला आहे. या महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं सांगितलं जातं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading