ऐरोली – कळवा एलिव्हेटेड प्रकल्पातील दिघा रेल्वे स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात

खासदार राजन विचारे यांनी दिघा येथे ऐरोली कळवा एलिव्हेटेड या रेल्वे प्रकल्पाची पाहणी एम आर व्ही सी, एम आय डी सी चे तसेच नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे या दोन मार्गांना जोडणारा ऐरोली कळवा एलिव्हेटेड हा महत्वकांक्षी प्रकल्प २०१४ ला राजन विचारे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर रेल्वे मंत्रालयाच्या पहिल्याच बजेट मध्ये रेल्वे मंत्री सुरेश प्रभू असताना एम यु टी पी 3 च्या कामामध्ये ऐरोली कळवा एलिव्हेटेड या प्रकल्पासाठी ४२८ कोटीची मंजुरी मिळवून दिली. या प्रकल्पाचे भूमिपूजन डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी जागेच्या अनेक अडचणी मुळे काम लांबवत चालले होते. राजन विचारे यांनी हा महत्वकांक्षी प्रकल्प रद्द होऊ नये म्हणून दोन टप्प्यात करून घेतला. पहिल्या टप्प्यातील दिघा स्थानकाचे काम सुरू करून घेतले आज विचारे यांनी दिघा रेल्वे स्थानकाची पाहणी केली. असता या स्थानकाचे काम ६० टक्के पूर्ण झालेले आहे. संपूर्ण दिघा स्थानकातील फलाटाची लांबी २७० मीटर आणि रुंदी १२ मीटर असे दोन फलाट असणार आहेत. त्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी दोन लिफ्ट आणि चार सरकते जिने तसेच ४ पादचारी भुयारी मार्ग विकसित करण्यात येत आहेत. या स्थानकासाठी ११० कोटी खर्च करण्यात येणार आहे. तसेच तिकीट खिडकीसाठी जी+२ च्या दोन इमारती स्थानकाच्या दोन्ही बाजूस उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये बुकिंग ऑफीस, ४-४ तिकीट खिडक्या असणार आहेत. स्थानकाचे काम २०२२ डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचे एम आर व्ही सीकडून सांगण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये कळवा एलिव्हेटेड रेल्वे स्थानक या रेल्वे स्थानकाची निर्मिती होणार आहे त्यामध्ये एलिव्हेटेड असा रेल्वे मार्ग दिघा स्थानकाला जोडणार आहे याचे काम सुरू होण्यासाठी या मार्गातील १०८० झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे काम एमएमआरडी मार्फत सुरू आहे त्यापैकी ९२४ नागरिकांना घरे आरक्षित केलेली आहेत व उर्वरीत प्रक्रिया सुरु आहे. ती होताच या मार्गाची ही काम लवकरच सुरु करण्यात येईल असे सांगण्यात आले. या स्थानकातील प्रवाश्यांच्या सोयीसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची २१४७ स्क्वे. मी. जागा मिळवून घेण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. खासदार राजन विचारे यांनी हि जागा मिळवून घेण्यासाठी एम आय डी सीचे प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्याशी चर्चा करून रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जागा मिळवून देण्यासाठी तत्काळ सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य विद्युत मंडळाच्या बंद असलेल्या विद्युत केबल काढून घेण्याच्या सूचना खासदार राजन विचारे यांनी एम एस ई बी च्या अधिकाऱ्यांना दिल्या. येत्या शुक्रवारी या सर्व केबल काढून घेण्याचे काम महावितरणाकडून काढून घेणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading